Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एफएमजीई पात्रता परीक्षेत वैष्णवीचे घवघवीत यश

तरुण भारतbyतरुण भारत
February 6, 2026
in marathwada
0
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर – एनबीईएमएसद्वारे घेण्यात आलेल्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन-एफएमजीई डिसेंबर २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, किर्गिजस्तान येथे एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या माहूर तालुक्यातील आष्टा येथील कु. वैष्णवी गजाननराव सोनटक्के हिने ह्या परीक्षेत ३०० पैकी १९८ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.या यशामुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून माहूर तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वैष्णवी ही पत्रकार संजय सोनटक्के यांची पुतणी आहे.

एफएमजीई (फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन) ही
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या व
भारतात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि परीक्षांचे उच्च व एकसमान मानकीकरण करण्याचे काम करणाऱ्या
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस अर्थात ‘राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळ’ (एनबीईएमएस) द्वारे परदेशातून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिक किंवा ओसीआय कार्डधारकांसाठी आयोजित केली जाणारी अनिवार्य पात्रता परीक्षा आहे. ही पात्रता परीक्षा वर्षांतून (जून आणि डिसेंबर) संगणक पद्धतीने घेतली जाते.
किर्गिजस्तानमधून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एफएमजीई उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ३०० पैकी १५० गुण (५०%) मिळवून ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे, भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे. भारतीय नागरिक किंवा ओसीआय कार्डधारक ज्यांनी किर्गिजस्तान किंवा परदेशातून एमबीबीएस पदवी पूर्ण केली आहे हे या पात्रता परीक्षेसाठी पात्र ठरतात.
ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच भारतात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी परदेशी पदवीधरांना तात्पुरती किंवा कायमस्वरूपी नोंदणी (रजिस्ट्रेशन) मिळते. अशा या महत्त्वाच्या एफएमजीई पात्रता परीक्षेत माहूरच्या आष्टा या खेडेगावातील वैष्णवी हिने यशस्वी होत आष्टा सारख्या ग्रामीण भागातून प्रथम महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवत वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडविला आहे.

वैष्णवी हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोळा तांडा आष्टा, त्यानंतर दहावीपर्यंत विद्यालयीन शिक्षण हे साखळे विद्यालय, उमरखेड व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे श्री शंकरराव चव्हाण विद्यालय आष्टा येथे झाले झाले असून, एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण हे विदेशामध्ये किर्गिजस्तान येथे सप्टेंबर २०२० ते मे २०२५ मध्ये यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. अर्थात परदेशात राहून शिक्षण घेत असताना आर्थिक,शैक्षणिक व वैयक्तिक अशा अनंत अडचणींचा सामना तीला करावा लागला. अशाही विपरीत परिस्थितीवर मात करून हार न मानता आपले डॉक्टर होण्याचे ध्येय कायम ठेवत एफएमजीई सारख्या कठीण व स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तिने दिवस रात्र अभ्यास करून अथक परिश्रम घेऊन पहिल्याच प्रयत्नात ३०० पैकी १९८ गुण घेऊन नेत्रदीपक यश प्राप्त करत आपली व आपल्या आईबाबांसह संपूर्ण सोनटक्के परीवाराची स्वप्नपूर्ती केली आहे.


डॉ.कु.वैष्णवी हिने प्रचंड संघर्ष, जिद्द आणि चिकाटी आणि कठोर परिश्रमातून मिळविलेल्या या यशाबद्दल आष्टासह तालुक्याचे ज्येष्ठ राजकीय नेते नामदेवराव केशवे,बाबाराव केशवे,अनंत केशवे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक,प्राचार्य राजेंद्र केशवे, डॉ.निरंजन केशवे, वसंतराव पिंगळे,उमाजी कराळे,गोपीनाथ सुरोशे, नगरसेवक प्रा.विलास भंडारे, प्रा.सुजित केशवे, अशोक सोळंके, चेतन कराळे, किरण वंजारे,कोथळकर सर, पावडे सर,प्रा.अजय राठोड, प्रा. प्रशांत कदम,प्रा.तुषार तास्के, प्रा. कोषटवार मॅडम यासह अनेकांनी तीचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कितीही कठीण असले तरी वैष्णवी हिने केलेल्या मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणता येते हे सिद्ध करून दाखविले आहे.हे उच्च शिक्षण घेणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

माहूर सारख्या जेमतेम वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध असलेल्या आदिवासी बहुल मागासलेल्या भागात एमबीबीएस डॉक्टरची नितांत गरज असून, डॉ. वैष्णवी सोनटक्के यांनी आता माहूर येथेच हॉस्पिटल उभारुन येथील गोरगरिब रुग्णांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post Views: 170
Previous Post

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लघुळमध्ये बससेवेचा ऐतिहासिक शुभारंभ

Next Post

गोतस्करीचा पर्दाफाश; रामतीर्थ पोलीसांची धाडसी कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

गोतस्करीचा पर्दाफाश; रामतीर्थ पोलीसांची धाडसी कारवाई

ताज्या बातम्या

श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नवीन M.R.I. मशीन होणार उपलब्ध #public #news

March 25, 2026

श्रीराम नवमी निमित्ताने 151 हवन कुंड श्रीराम जन कल्याण यज्ञ #public #news #viral

March 25, 2026

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याकडून एका चालकाला मारहाण झाल्याच्या घटनेवरून चालकांनी पुकारलेल्या

March 25, 2026

सोलापूर : गेल्या चार दिवसांपासूनसोलापूरच्या तापमानामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे.

March 25, 2026

कारण नसताना विनाकारण एका ३० वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड व सत्तुरने हल्ला केला

March 25, 2026

” गुरु स्मरण सोहळा  “

March 25, 2026
सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

March 25, 2026

संभवामी युगे युगे कार्यक्रम आपल्या सोलापूर मध्ये २७ मार्च २६ रात्री ८:३० हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये

March 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765088

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697