जेऊर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडगाव ता.(करमाळा) येथील सांस्कृतिक कार्यक्रम दिं.16 रोजी पंचायत समिता सदस्या सौ. सोनालीताई तकिक व शिक्षण विस्तार अधिकारी श्री.जयवंत नलवडे साहेब यांचे हस्ते उद्घाटन करुन संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊमाता , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून झाली.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी विद्यमान पंचायती समिती सदस्या सौ.सोनाली ताई तकिक, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे साहेब यांनी पालक -माता विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रवादी युवा काँग्रेस तालुकाअध्यक्ष श्री महेश बोराडे,सरपंच सौ आशाताई गुटाळ,माजी पोलीस उपनिरीक्षक श्री बलभीम सोपान बोराडे,ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी गायकवाड, सौ शशिकला पाटील ,शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविराज शिंदे,उपाध्यक्ष श्री भैरवनाथ शिनगारे , शिवाजी भोरे,मा. ग्रामपंचायत सदस्य संतोष मस्तुद, युवक नेते अमोल बोराडे, आदिवाशी समाज पकल्प नियोजन आढावा समिती ,मुंबई बोरीवली चे अध्यक्ष श्री.राजेंद्र पवार ,संतोष गुटाळ, युवक नेते बालाजी बोराडे ,युवक नेते अक्षय पाटील व चिखलठाण केंद्रातील सर्व शिक्षक/शिक्षिका उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुलांनी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण अशा विविध गाण्यातून सामाजिक संदेश दिला या कार्यक्रमासाठी गावातील लोकांनी भरभरून देणगी दिली. 73 हजार रुपये देणगी जमा झाली.या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका तथा चिख लठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ वंदना पांडव मॅडम शाळेतील शिक्षक श्री बापूराव तकिक तसेच श्री प्रदीप आव्हाड सर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नंदकिशोर वलटे यांनी केले .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री भारत पांडव साहेब,माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष मस्तुद, साऊंड सिस्टिम ऑपरेटर श्री सुभाष लगस,शिवगर्जना प्रतिष्ठान केडगाव,भैरवनाथ मित्र मंडळ केडगाव शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार श्री प्रदीप आव्हाड सर यांनी मानले.





















