बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कर्मवीर सप्ताहामध्ये सातवे षुष्प अर्पण करण्यासाठी गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
क्रिकेट, बुद्धीबळ, तसेच मनोरंजनात्मक खेळाचे इयत्तेनुसार सामने घेण्यात आले. सर्व स्पर्धांचेस्प नियोजन क्रीडाशिक्षक एन. एन. महाले यांनी केले होते. विजयी संघ व विजयी खेळाडूंना बक्षीसे देण्यात आली.
प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर सर, प्रमुख पाहुणे ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक गणेश बुरगुटे, पोलीस पाटील दीपक बुरगुटे, योगगुरु सिद्धेश्वर शिंदे, प्रतिष्ठित ग्रामस्थ अमोल बुरगुटे यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . एसएससी बॅच १९९४-९५ च्या विद्यार्थींनी रुपये ५,०००/- मूल्य असलेली पुस्तके विद्यालयास भेट दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक दयानंद रेवडकर सर यांनी उपस्थित मान्यवराचा शाल, पुष्पगुछ देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक प्रशांत काशीद यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सहशिक्षक अतुल राठोड यांनी करुन दिला.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रमेश लंकेश्वर यांनी केले. आभार सहशिक्षक डी. डी. राऊत यांनी मांडले मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



















