नायगाव : ग्रामीण भागातून जिद्द, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून होटाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा हरिहरराव चालीकवार यांनी राज्यस्तरीय शब्दकोडे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मागील जानेवारी महिन्यामध्ये राज्यस्तरीय शब्द कोडे स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या स्पर्धेत नरसी केंद्रांतर्गत होटाळा जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा चालीकवार यानी आपल्या अभ्यासू वृत्तीने.शब्दसंपत्तीने आणि चिकाटीने सर्व स्पर्धकांना मागे टाकत अव्वल स्थान मिळविले. ग्रामीण भागातील शिक्षकही कोणत्याही शहरी स्पर्धकां पेक्षा कमी नाहीत, हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले.
त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल नायगांव तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, नरसी केंद्रप्रमुख कपिल नलबलवार सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी भरभरून अभिनंदन केले. त्यांच्या यशामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसाठीही त्या आदर्श ठरत आहेत.
होटाळा गावात या यशाची चर्चा असून सौ. वर्षा चालीकवार यांच्यावर सर्व स्तरांतून मोठा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामीण मातीतून घडलेले हे यश अनेकांना प्रेरणा देणारे ठरत आहे.

























