तभा फ्लॅश न्यूज/नायगांव : नायगांव तालुक्यामध्ये या नक्षत्रातील पाऊस हा यंदाच्या वर्षातील खरिप हंगामातील शेतातील पिकांसाठी ही एक पुनरुज्जीवनाची संधी आहे, असं मत होटाळा येथील स्थानिक शेतकरी संभाजी पा. जाधव यांनी मत व्यक्त केले आहे”.
नायगांव तालुक्यांमध्ये गेल्या काही आठवड्या पासून पाऊस होत नसल्यामुळे शेतकर्यामध्ये चिंता वाढवली असतांनाच, मघा नक्षत्राच्या आगमनाने नायगांव तालुक्यात दि.२५ पासून दमदार पाऊस झाला.आणि त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी लाभली आहे. या जोरदारपणे पडलेल्या पावसामुळे अनेक गावातील पिकं ही जोमाने बहरली असून.सध्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललं आहे.
नायगांव तालुक्यातील विशेषतः नरसी,कांडाळा, होटाळा, धानोरा,मरवाळी,मरवाळी तांडा या सह विविध गावांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या खरीप पिकांमध्ये चांगल्या वाढीचे लक्षण दिसून येत आहेत. नरसी येथील शेतकरी मनोहर सुर्यवंशी, व काडांळा येथील शेतकरी मनोहर कदम म्हणाले, “आम्हाला वाटलं होतं की पाणी नसल्यामुळे पिकं आता वाळून जातील,पण या नक्षत्रातील वेळचा पाऊस वेळेवर पडल्यामुळे. आता पिकं जोमात आली आहेत.”
नायगांव कृषी विभागानेही याची पुष्टी केली असून अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता पुढील आठवड्यातही पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे, जे पिकांच्या वाढीस अनुकूल ठरणार आहे.