तभा फ्लॅश न्यूज/वेळापूर : वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरून वारंवार अवैध दारू विक्री करणारे इसमांवर प्रतिबंध व्हावा व त्यांनी भविष्यात अवैध दारू विक्री करू नये याकरिता त्यांच्याकडून जास्तीत जास्त रक्कमेचे व दीर्घ मुदतीचे बंधपत्र घेण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्याकडे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ९३ प्रमाणे एकूण २२ प्रस्ताव जून २०२५ मध्ये पाठविण्यात आले होते.
उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस यांच्या कार्यालयाकडून वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील २२ अवैध चोरून दारू विक्री करणारे इसमांची सुनावणी नोटीस बजावणी करिता वेळापूर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाले होते. सदरची सुनावणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
अवैध धंदेवाल्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी पथकाची नियुक्ती
वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरून अवैध धंदे करणारे इसमांची माहिती मिळताच त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी तसेच वेळापूर पोलीस अंमलदार यांनी सदरची कारवाई केली आहे.
Post Views: 9