मुदखेड – पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–१, मुदखेड येथे अधिकारी व कर्मचारी असतानाही दवाखान्यात वेळेवर कर्मचारी व अधिकारी उपस्थिती नसल्याने नागरिक व पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यालयीन वेळेत दवाखाना बंद असल्याचे चित्र असून जनावरांच्या उपचारांसाठी आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत वाट पाहत बसावे लागत आहे.
या दवाखान्यात डॉ. जगताप (मायादम सहायक आयुक्त), डॉ. प्राजक्ता पेंडकर (विस्तार अधिकारी), डॉ. खान (विस्तार अधिकारी)नरवाडे (मायादम पशुधन प्रवेशक) व पिराजी हाटकर (परिचर) असे कर्मचारी कार्यरत असतानाही स्वच्छतेचा अभाव आहे.नेहमी गैरहजर राहून मनमाणी कर्तव्य बजावत आहेत. दवाखान्यातील परिसरात अस्वच्छता असून जनावरांना पिण्यासाठी पाण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही.
गंभीर बाब म्हणजे जनावरांच्या गर्भधारणेसाठी आवश्यक सेवा दवाखान्यात उपलब्ध नसून बीए–३ कंठर बाहेर खासगी डॉक्टरांकडे ठेवले जाते. त्यामुळे पशुपालकांना आधी त्या डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांना बोलावून दवाखान्यात आणावे लागते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकारी D.D. साहेबांनी त्या अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून तातडीने दखल घेऊन दवाखान्यात नियमित सेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.
























