सोलापूर – महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची रंगत वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर शहरात भाजपने वातावरण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अ) सुनिता सुनिल कामाठी, ब) अंबिका हनुमंत चौगुले, क) सत्यनारायण रामय्या गुर्रम व ड) विजय भुमय्या चिप्पा यांनी सोमवारी होम टू होम प्रचार केला.
दरम्यान, प्रभागातील हॉटेल सत्यम, ७० फूट रोड भाजी मंडई, गेंट्याल चौक, संत तुकाराम चौक, बापूजी नगर परिसर, विद्यानगर, पाथरूट चौक, खड्डा चौक, अशोक चौक, पोलिस चौकी, क्रांती झोपडपट्टी, कमटम नगर, श्रीकृष्ण मंदिर, भावनाऋषी पेठ दवाखाना मार्गे जाऊन पंचमुखी मंदिर होम टू होम प्रचार करण्यात आला.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

















