वेळापूर – नगरीचे आराध्य दैवत श्री अर्धनारी नटेश्वर यांच्या यात्रा उत्सवाची तयारी आमदार उत्तमराव जानकर, पंचायत समिती सदस्या सौ विमलताई उत्तमराव जानकर, जि प सदस्या सौ मीनाक्षी मिलिंद सरतापे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात आली असून गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रा कमिटी, ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उत्सव धार्मिक विधी, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजता श्रींचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार असून या निमित्ताने सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजता श्रींचा साडे वाजत व पालखी सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ११ ते पहाटे १ वाजेपर्यंत साड्यांचा कार्यक्रम व आकर्षक दारूकामाची आतषबाजी होणार असून भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.
यात्रेनिमित्त विविध स्पर्धा व मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
३ एप्रिल रोजी आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतीने दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तसेच
३ एप्रिल रोजी शुक्रवारी गजी ढोल कार्यक्रम होणार आहे.
शनिवार, ४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता महादेव मंदिर येथे सवंद्यावाद्य स्पर्धा होणार आहे. रविवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बाजार तळ, ज्योतिबा मंदिर येथे महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच सोमवार, ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता पालखी मैदान येथे श्वान शर्यत होणार आहे. यात्रेची सांगता मंगळवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता बाजार तळ येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगणार आहे.
या यात्रा उत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे उपसरपंच नानासाहेब मुंगुस्कर, ग्रामपंचायत अधिकारी कैलास सुरवसे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, यात्रा कमिटी अध्यक्ष काशिनाथ आडत उपाध्यक्ष एडवोकेट विठ्ठल मंडले उपाध्यक्ष रणजीत साठे कार्याध्यक्ष अमोल मंडलिक खजिनदार दादा तुपे सरचिटणीस विनायक भगत सचिव अभिजीत साठे सेक्रेटरी विजय पवार सदस्य मनोहर माने, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदींनी केले आहे


























