मुंबई : अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad ) यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला. काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे काळी शाई फेकली.
दरम्यान, भाजपशी संबंधित ‘शिवधर्म फाउंडेशन’चे कार्यकर्ते असल्याचे आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सात जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभेत या हल्ल्याबद्दल विजय वडेट्टीवार यांची तीव्र प्रतिक्रिया उमठली. वडेट्टीवार म्हणाले, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला का झाला? ते एका शांततापूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. त्यांच्या संस्थेचे नाव ‘संभाजी’ ठेवले, हेच कारण आहे. अनेक लोक त्यांच्या नावात ‘संभाजी’ ठेवतात, त्यांना मारहाण का केली? हे एक अमानुष कृत्य आहे. गायकवाड यांना गाडीतून ओढून मारहाण करण्यात आली आणि शाई फेकली गेली.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, हल्ला करणाऱ्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. (Pravin Gaikwad ) त्याच्यावर पिस्तूल बाळगल्याचा आणि त्याच्या चुलत भावाचा खून केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याचा उद्देश स्पष्ट आहे. प्रवीण गायकवाड यांचा जीव घेण्याचा होता का असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आहे, मग अशा कार्यक्रमांमध्ये पोलीस बंदोबस्त का नव्हता? असे रे म्हणाले.
योग्य कारवाई केली जाईल : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले, मी या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली आहे. जे लोक हल्ला करत होते, त्यांचा आरोप होता की ‘तुम्ही संभाजी का ठेवलं, छत्रपती संभाजी का ठेवलं नाही?’ पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते आणि प्रवीण गायकवाड यांना विनंती केली होती की, फिर्याद द्या. मात्र, ते तयार नव्हते. तरीही पोलिसांनी फिर्याद घेतली आणि आरोपींना अटक केली आहे. यावर आवश्यक त्या कलमांनुसार योग्य कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.