बार्शी – तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज विद्यालय हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास वळेकर, उपाध्यक्ष म्हणून न्यू हायस्कूल पिंपळवाडीचे मुख्याध्यापक अण्णासाहेब व्हळे तर सचिवपदी नागनाथ विद्यालय जामगावचे मुख्याध्यापक शक्तीकुमार संकपाळ यांची एकमताने निवड करण्यात आली.
बार्शी तालुक्यातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या. नियंत्रण समितीचे अध्यक्ष सुभाष माने व माजी अध्यक्ष राजकुमार पुजारी यांचे अध्यक्षतेखाली सुलाखे हायस्कूल बार्शी येथे ही सभा झाली.
सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यावर तालुक्यातून जिल्हा प्रतिनिधी म्हणून मुख्याध्यापक धन्यकुमार उर्फ अण्णासाहेब मोरे यांची निवड करण्यात आली. तर यशवंत विद्यालय शिराळेच्या मुख्याध्यापिका संगिता गोरे यांची जिल्हा महिला प्रतिनिधीकरिता एकमताने ठराव पास झाला. यावेळी बाजार समितीचे संचालक सुरेश उर्फ सूर्यकांत गुंड यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन सर्वांच्या निवडी केल्या. संघाचे उपाध्यक्ष व्हळे सर यांनी आभार मानले. मुख्याध्यापक संघाचे आजी-माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

























