कंधार – डी. बी. पाटील शासकीय विश्रामगृह कंधार येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ ची बैठक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष धनराज पाटील लुंगारे (बाळू पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे माजी सचिव विनोद पाटील तोरणे यांची शिवजन्मोत्सव सोहळा समिती च्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह कंधार येथे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते ही बैठक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष बाळू पाटील लुंगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळ्या विषयी विविध विषयावर चर्चा होऊन जन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा सचिव विनोद पाटील तोरणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व उर्वरित कार्यकारणी निवडीची बैठक दिनांक २९ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह कंधार येथे दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीला धनराज पाटील लुंगारे , नामदेव कुट्टे , बळीराम पाटील पवार , नितीन पाटील कोकाटे , परमेश्वर पाटील जाधव , संदीप पाटील तोंडचिरे , प्रदीप पाटील हुंबाड, अमित पाटील मोरे , भगवानराव पाटील गिरे विकास पाटील गारोळे, शहाजी पाटील शिंदे , अंकुश पाटील कदम, सौरभ मोरे , संतोष बोरोळे, डी जी जाधव, त्रिभुवन मोरे, शाहरुख शेख , कैलास पाटील पवळे ,विष्णू पाटील जाधव, ज्ञानेश्वर पाटील तेलंग ,विकास पाटील लुंगारे यांच्यासह तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























