सोलापूर : कुमठा नाका परिसरातील सोलापूर एका विनाअनुदानित शाळा गेल्या १३ वर्षापासून विद्यार्थ्यांना शिक्षण व शिक्षणाचे धडे देत असताना व या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याचे कार्य सोडून सहशिक्षकेसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. शिक्षण खात्याची प्रतिमा मलिन झालेली आहे. ज्याशाळेत देश घडविण्याची कार्य केले जाते. त्याच शाळेत एका शिक्षिकेसोबत अश्लिल वर्तन करण्यास व त्यांना कामावरुन काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या, तिचे सोबत शारीरीक लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकाला तात्काळ अटक करण्यात यावे कारवाई होणे अत्यंत गरजचे आहे.
पिडित महिला चेअरमन प्रभाकर गोरंटी यांच्या कानावर या गोष्टी घातल्या होत्या. तरी देखील प्रभाकर गोरंटी यांने मुख्याध्यापकावर कारवाई न करता त्याला पाठीशी घातले आहे. मुख्याध्यापकावर योग्य वेळी कारवाई न करता उलट पिडितेला ही बाब तु बाहेर सांगितली तर तुला शाळेतून काढून टाकीन अशी धमकी दिलेल होती. तुला समाजात तोंड दाखविण्यास जागा उरणार नाही. तुझी इज्जत जाईल. बदनामी होईल अशी भिती पिडितेला घातली. माझी शिक्षण मंत्राबरोबर ओळख आहे. अशा कृत्यामुळे बंडा प्रशालेची देखील सोलापूरात बदनामी होत आहे. वारंवार सांगूनही तो मुख्याध्यापक त्या शिक्षिकेजवळ येण्याची कोणतीही संधी सोडत नव्हता. तो लिंगपिसाट झालेला होता. त्याचा धीर तोल सुटलेला उन्माद होऊन तो त्या शिक्षीकेच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठवून तुम्ही मला खूप आवडता असे दैनिकातून प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार युवक पँथरच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की, अन्यथा शिक्षक ज्ञान दान्याचे कामाला काळीमा फासल्यासारखे होईल विद्यार्थी शिक्षकाचे असे वाईट वर्तन बघून ते देखील तसेच करत राहतील. तेव्हा विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करुन या मुख्याध्याकाला कठोर शिक्षा होणे गरेजेचे आहे.
असे कृत्य शाळेत घडत असेल तर पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांवर देखील असे कृत्य घडू शकते अशी भिती पालकाकडून व्यक्त होत आहे. म्हणून युवक पँथरच्या वतीने संबंधीत लिंगपिसाट मुख्याध्यापक एम.डी. बिराजदार च्या विरोधात गुन्हा दाखल झाले असून तो मोकाट फिरत असून त्याला तात्काळ अटक करावे किंवा फरार घोषित करवे.
तसेच सोलापूर शहरातील VIP रोड, सात रस्ता येथील गेल्या अनेक वर्षापासून खादय पदार्थाच्या गाड्या व इतर खोके धारकांने व गाळे धारकाने त्याचा गाळा सोडून व रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा करत आहेत. याठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणात र्वदळ होत असते. या रस्त्यालगत डॉ. आंबेडकर भवन, संगमेश्वर शाळा, महापालिका शाळा असे मोठे शासकीय ऑफीस व शाळा आहेत. या भाग नेहमी र्वदळीचा असतो. व काही अंतराव दाटलोकसंख्या वस्ती आहे. व तेथे रोज छोटे मोठे अपघात झालेले आहेत. भविष्यामध्ये या अतिक्रमण मुळे मोठा अपघात व एखादयाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील विषयाचे गंर्भीय घेणे पोलीस प्रशासन, महानगरपालिका अतिक्रमण विभाग, वाहतुक शाखा यांना कळकळीची विनंती आहे वरील विषयाचा लवकरात लवकर कारवाई करून व चालक किंवा मालक यांच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करावेत.
आज रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त २६/०१/२०२६ रोजी युवक पँथरच्या वतीने धरणे आंदोलन करीत आहोत.
























