सोलापूर – विशाल राजु गोखले याला सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलीस आयुक्तालयाकडून काढण्यात आले आहेत.
विशाल राजु गोखले, वय-२३ वर्षे, रा. घर नं. २२, मद्दा झोपडपट्टी, अशोक चौक, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर याचेविरुध्द सन २०२१, २०२३ व २०२५ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, सामान्य नागरीकांना साथीदारांसह मारहाण करुन दहशत निर्माण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.



























