वेळापूर – येथील विश्वकर्मा सुतार समाज मंदिर येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विश्वकर्मा प्रतिमा पूजन व कलश पूजन सकाळी करण्यात आले यानंतर १०:०० ते १२:०० यावेळेत ह भ प राम महाराज शेरकर सुरवड यांचे भगवान श्री विश्वकर्मा यांच्या चरित्रावर सुश्राव्य असे किर्तन झाले. त्यानंतर बारा वाजून पंधरा मिनिटांनी पुष्प वृष्टी करण्यात आली. तसेच आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वेळापूर पंचक्रोशीतील भाविक भक्त वारकरी, ग्रामस्थ, सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी समाजातील शिवाजी सुतार (गुरुजी), वासुदेव सुतार, शिवाजी सुतार , परमेश्वर सुतार, उमेश सुतार, महादेव क्षीरसागर, श्रीराम सुतार, तेजस सुतार, मनोज सुतार, वैभव सुतार, राहुल सुतार, दत्तात्रय सुतार, अशोक डोळसकर, यतिराज सुतार, विठ्ठल क्षीरसागर, संभाजी क्षीरसागर, विपुल सुतार, सोहम सुतार, हनुमंत शिरसागर, आशुतोष सुतार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


























