बार्शी – श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था, सुतार नेट, कसबा पेठ, बार्शी येथे दि. ३१ जानेवारी रोजी श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास गुंड-पाटील उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमास भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संदीप सुतार, श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष
निशिकांत सुतार यांच्यासह बप्पा सुतार, रमेश सुतार, विष्णुपंत खांडवीकर, दीपक सौंदरकर, सुरेश राऊत, मुकुंद पालके, लोंढे, बापू बोरगावकर, भगवान पालके, भागवत पालके, समाधान राऊत, संभाजी सुतार, रामलिंग क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शुभांगी सुरेश सुतार यांच्या माध्यमातून भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला समाजबांधवांसह महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. विश्वकर्मा जयंतीनिमित्त एकोप्याचे व भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
























