टेंभुर्णी – येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या फार्मसी क्षेत्रभेटी अंतर्गत कोल्हापूर मधील एसजी फायटो फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्माण कंपनीस भेट दिली. या भेटीदरम्यान कंपनीमधील व्यवस्थापकांनी व कर्मचाऱ्यांनी कंपनीमधील सर्व कामकाजाबद्दल तसेच फार्मासिस्टचे फार्मा कंपनीमधील महत्त्व,कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी कंपनीमधील सर्व विभागास भेटी दिल्या जसे की औषधे बनवणारी यंत्रसामग्री, लेबलिंग, पॅकेजिंग, स्टोरेज तसेच पावडर फॉर्मुलेशन, कॅप्सूल, टॅबलेट, लिक्विड फॉर्मुलेशन या सर्व विभागांना भेटी देऊन माहिती संग्रहित केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व शंकेचे निवारण कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चव्हाण यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांचे व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या शैक्षणिक भेटीदरम्यान महाविद्यालयातील सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

























