लोकसभा निवडणुकीसाठी अंध मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड इंडिया यांच्या साहाय्याने ब्रेल लिपीमध्ये मतदार माहिती चिठ्ठी छापण्यात येणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४करीता जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या अंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त अंध मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यात सुलभता व्हावी, यासाठी ब्रेल लिपीमध्ये माहिती दस्तऐवज तसेच चिठ्ठी छापण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात नॅबचे समन्वय अधिकारीही नेमण्यात येणार आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.