माहूर – भारत निवडणूक आयोग अंतर्गत, मुख्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना पत्र काढून मतदार दिनाची शपथ घेण्याचे सुचित केल्याने माहूर तालुक्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी रविवार २५ जानेवारी रोजी मतदार दिनाची शपथ घेतली.
भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस भारतात साजरा केला जातो. अधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने याची स्थापना केली आणि प्रथम २५ जानेवारी २०११ रोजी साजरा केला.
त्याच अनुषंगाने भारत निवडणूक आयोग अंतर्गत मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य कडून मतदार दिन साजरा करण्याबरोबरच मतदार दिनाची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या अंतर्गत माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी गटविकास अधिकारी,मुख्याधिकारी, उप अधीक्षक भूमि अभिलेख, दुय्यम निबंधक, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका कृषी अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वन परिक्षेत्र अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी या शासनाच्या विविध प्रशासकीय कार्यालयात मतदार दिनाची शपथ घेण्याचे सूचित केले होते. त्यानुसार याठिकाणी शपथ घेण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मुख्य मतदार दिनाची शपथ कार्यक्रम माहूरच्या तहसील कार्यालयात पार पडला. यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे, नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम यांचे सह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

























