मंगळवेढा – आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबने दि २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मंगळवेढा ते खोमनाळ मतदार जनजागृती सायकल रॅली काढून प्रबोधन केले तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकरी मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढविण्याकरिता सायकल स्वारांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बाजावावा अशी साद घालण्यात आली
यावेळी मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो,आपले मत पवित्र मत,मतदान करूया लोकशाही बळकट करूया,लावा बोटाला शाई बळकट करा लोकशाही,अंगणात घाला रांगोळी सडा मतदानाला बाहेर पडा,चला रे चला मतदानाला चला असा मतदानाचा जनजागर करण्यात आला
सदर रॅलीचा समारोप तहसील कार्यालय मंगळवेढा येथे करण्यात आला यावेळी राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सर्व रायडर्सना सन्मानित करण्यात आले याअगोदारही वारी परिवाराच्या वतीने अनेक गावात मतदान जनजागृती करण्यात आली निश्चितच सदर स्तुत्य उपक्रमामुळे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे
सदर रॅलीत चंद्रजीत शहा,विजय क्षीरसागर,विष्णू भोसले,विठ्ठल बिले, दत्तात्रय जाधव,स्वप्नील टेकाळे,कल्याण घुले,पांडुरंग कोंडूभैरी,विवेक वाले,रवी जाधव,अवी जाधव प्रा विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू,सुधीर बिले,हणमंत ढेंबरे आदी सहभागी होते यावेळी नायब तहसीलदार जयश्री स्वामी,स्वीप नोडेल ऑफिसर पूनम नरसोडे,हरिप्रसाद देवकर,अमोल वस्त्रे,तहसील कार्यालय व मंगळवेढा नगरपरिषद यांचे विशेष सहकार्य लाभले


























