Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘आम्ही हे करू’ : मनसेचा चार कलमी जाहीरनामा प्रकाशित 

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 15, 2024
in solapur
0
‘आम्ही हे करू’ : मनसेचा चार कलमी जाहीरनामा प्रकाशित 

Oplus_131072

0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, १५ नोव्हेंबर (हिं.स.) : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘आम्ही हे करू’ या टॅग लाईनने पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. हा जाहीरनामा चार भागांत विभागला आहे.

मनसेचा जाहीरनाम्यात चार भाग आहेत. पहिल्या भागात मूलभूत गरजा, दुसऱ्या भागात दळणवळण, वीज, पाणी नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण जैवविविधता यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या भागात प्रगतीच्या संधी आणि राज्याचे कृषी धोरण आणि चौथ्या भागात मराठी अस्मिता हा विषय घेण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्षे झाले आहेत. या १९ वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती यात दिली आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकाच दिला आहे. पण, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या गोष्टी देखील अंतर्भूत केल्या आहेत.

मी २००६ मध्ये राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती २०१४ ला आली. पण या काळात मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. २०१४ ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षांत ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचं कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदललेले नाहीत, अद्यापही तेच प्रश्न आहेत. अद्यापही आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत, म्हणून मला असं वाटतं की आज हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे. माझ्या हातात ही गोष्ट येईल, या आशेने आपण जाहीरनामा समोर ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.

विद्यामंदिरं उभी करणे, गडकिल्ल्यांचे संवर्धन महत्वाचे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्यभरात शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करणार, असे म्हटलं आहे. पण त्याऐवजी राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचे आहे आणि राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. महाराष्ट्रात चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मग शिवाजी महाराजांच्या मंदिरांची गरज काय? त्याऐवजी राज्यातील मुलांना शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसेच्या जाहीरनाम्यात ‘लाडकी बहीण योजना’ किंवा ‘महालक्ष्मी योजना’ यासारख्या योजनांचा समावेश का नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, याचं कारण महाराष्ट्राचं एकूण आर्थिक गणित पाहिल्याशिवाय मी असल्या घोषणा करु शकत नाही. असल्या घोषणांना अर्थ नसतो. महाराष्ट्रावर आर्थिक बोजा न येता या योजना सुरु राहिल्या, तर मी त्याला गिफ्ट म्हणेन. पण उद्या या गोष्टी सुरु राहिल्या नाहीत तर मी या योजनांना लाच म्हणेन. अशा योजना सुरु करताना राज्याचा आर्थिक ढाचा बिघडता कामा नये. सरकारकडून महिलांना पैसे मिळतात, याचा आनंदच आहे. पण या सगळ्यातून आपण काही वेगळे खड्डे तर खणून ठेवत नाही ना, हे देखील तपासले पाहिजे.

Post Views: 16
Previous Post

सोलापूरात रन फॉर वोट स्पर्धा संपन्न 

Next Post

शिवसेना महायुतीला विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शिवसेना महायुतीला विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा

शिवसेना महायुतीला विविध राजकीय व सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

संजय पैठणकर यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला.’खूप शिका, पण आई-वडिलांना विसरू नका.

February 13, 2026

तीन महिने उलटून गेले तरीही या स्थळ संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही..#viral #solapurnews

February 13, 2026

1 हजार 32 कोटीच्या विकास कामांना मंजुरी.#viral #solapurnews

February 13, 2026

डीबी वुड या 45 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) सकाळी अचानक भीषण आग.

February 13, 2026

इलेक्ट्रिक बसला लागली आग.50 कामगार सुखरूप.#public #marathinews #viral

February 13, 2026

लाडक्या बहिणींना मिळणार एकदम ६००० रुपये..#लाडकी_बहीण_योजना #ladkibahin

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678454

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697