सोलापूर – जि.प. प्रशाळा कोरवली येथे गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करून शैक्षणिक गुढी उभी करण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण, पाद्यपूजा करून शाळेतील पहिले पाऊल साजरे करण्यात आले.
यामध्ये कोरवलीचे सरपंच दयानंद पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिनाथ म्हमाणे, उपाध्यक्ष रमेश तारके व केंद्रप्रमुख राठोड यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना साखरेचा हार, टोप्या, गुलाब, चॉकलेट,बिस्कीट वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेब कस्तुरे, चंद्रकांत म्हमाणे, चिदानंद तारके, विक्रम तीर्थे,जमदाडे, गायकवाड यासह मोठ्या प्रमाणात महिला पालक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुहास पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.





















