नवीन नांदेड – पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या एक हजार सरपंच व अधिकारी यांच्ये विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालय, काळेश्वर मंदिर समिती व जिल्हा परिषद शाळा विष्णुपुरी यांच्या वतीने दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी स्वागत करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत कार्यालय,जिल्हा परिषद शाळेसह काळेश्वर मंदिर दर्शन व पशुसंवर्धन ईमारत पाहणी केली.
पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या एक हजार सरपंच व अधिकारी यांनी दिनांक ३१ जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील ग्रामपंचायत व पंचायत समिती भेटी देऊन महाराष्ट्रातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत व महिला सक्षमीकरण ग्रामपंचायत भेटी देऊन महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कामाची माहिती व अभ्यास करून, वरील विषयाची आदान प्रदान करून अभ्यास पूर्ण माहिती घेतली.
यावेळी वसंत राजुरकर संत्र संचालन यशादा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ ते १ फेब्रुवारी चार दिवस अभ्यास दौरा, नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय विष्णुपुरी, तुप्पा, पांगरी, मार्कड येथे भेट देऊन विविध विकासकामे पाहणी केली व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली.यावेळी विष्णुपुरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी यांनी लेझीम पथकाच्या सादरीकरणाने उत्साहात स्वागत केले यावेळी डॉ.बाबा हरजिंदरसिंग यांच्यी प्रामुख्याने उपस्थित होती, तर विष्णुपुरी ग्रामपंचायत येथे सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे व ऊपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे यांनी व ग्रामपंचायत अधिकारी संजय कानोडे यांनी स्वागत केले.
यावेळी पथकाला शासनाच्या वतीने माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल सुर्यवंशी, रमेश कदम,संजय कानोडे, वर्षा पाटील, यांच्या सह नियुक्ती केलेल्या अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन करून माहिती दिली.
यावेळी काळेश्वर विष्णुपुरी समिती पदाधिकारी शंकरराव हंबर्डे,धारोजी हंबर्डे, उत्तमराव हंबर्डे,बालाजी हंबर्डे, प्रभाकर हंबर्डे,यांच्या सह माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे, सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे ,मुख्याध्यापक सौ.ऊज्वला हंबर्डे,सरपंच सौ.संध्या हंबर्डे,ऊपसरपंच अर्चना हंबर्डे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह जेष्ठ नागरिक ,ग्रामपंचायत कर्मचारी ऊग्रेसन हंबर्डे,संतोष हंबर्डे,काळबा कंधारे,कालीदास बारसे, पोलीस पाटील प्रविण हंबर्डे यांनी सहकार्य केले. सुत्रसंचलन खदीर व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव यांनी केले.

























