माळशिरस – गव्हाला पोषक वातावरण असल्यामुळे यावर्षी सुरवातीस (नोव्हेंबर) केलेले गव्हाचे पिक जोमात आल्याचे सर्वत्र दिसून येत असून शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त होत असून पिक हातात येई पर्यंत निसर्गाने साथ दिली तर चांगले उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
माळशिरस येथील शेतकरी ॲड मिलिंद कुलकर्णी यांनी जमिनीची चांगली मेहनत घेऊन गव्हाचे पिक जोपासले असून ८० गुंठ्यांत ४० क्विंटल उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी अंकुर केदार या गव्हाच्या जातीची ८० गुंठे क्षेत्रात एकरी ४० किलो प्रमाणे ८० गव्हाच्या बियाणाची पेरणी केली .पेरणी करताना एकरी १८;४६ ५ पोती खताची मात्रा दिली. .२१ दिवसानंतर वेस्टा या तणनाशकाची फवारणी केली. एकरी १ पोते युरिया ,१ पोते सम्राट ,त्यानंतर ३० दिवसानंतर युरिया पोते व एम ओ पी १ पोते खताची मात्रा दिली .
पेरणी नंतर २१ दिवसांनी वेस्टा औषधादाची फवारणी केली.तसेच 19;19;19 व ज्ञानू युरियाची फवारणी केली गरजेनुसार पाण्याच्या सहा पाळ्या दिल्या आता गव्हाची चांगली वाढ होऊन चांगली लोंबी लागली असुन चागला दाणा भरला आहे.सुमारे चार इंच लांबीची लोंबी असून ५० ते ६० दाणे भरले आहेत. .पिकावर कसलीही रोगराई आली नाही
.मार्चच्या पहिल्या आठवड्यात गहू काढणीला येऊन ८० गुंठ्यात ४० क्विंटल प्रमाणे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली असून सर्वत्रच गहू पिक जोमात आले आहे. निसर्गाने साथ दिल्याने ,सुरवातीस पेरणी केल्याने ,हवामानात थंडी टिकून राहिल्याने गहू पिकाची वाढ चांगली झाली असून बियाणेही दर्जेदार असल्याने पिक एकसारखे आले आहे. ८० गुंठ्यात ४० क्विंटल उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.अड,मिलिंद कुलकर्णी ,शेतकरी .माळशिरस
















