नवीन नांदेड – श्री गुरू दशमुख आश्रम, भिमाशंकरनगर गोपाळचावडी येथे दि.५ फेबु्रवारी ते १२ फेबु्रवारी २०२६ या कालावधीत विश्र्वशांती महायज्ञ आणि श्री केदारनाथ रावळ जगद्गुरू पट्टाभिषेक रजत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या नमित्ताने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संबोधित करताना सदरील धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने परमेश्वराचे महती सांगत असताना परमेश्वर हे मानव जिथे जिथे आहे तिथ परमेश्वर आहे असे मत जगद्गुरु श्री भीमाशंकर शिवाचार्य महाराज यांनी मांडले.
गोपाळ चावडी येथील श्री गुरू दशमुख आश्रम, भिमाशंकरनगर गोपाळचावडी येथे ५ फेबु्रवारी ते १२ फेबु्रवारी २०२६ या कालावधीत गोपाळचावडी येथे १०८ महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती राहणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. केदार जगद्गुरु यांचे आशिर्वाद घेवून सांगितले. एवढेच नसून या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेवून येणार असल्याचेही अभिवचन जगद्गुरु यांना त्यावेळी दिले.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असून कार्यक्रमाचे संयोजक माजी आमदार ओमप्रकाश
ओमप्रकाश पोकर्ण असल्याचे माहिती महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुढे बोलताना जगद्गुरु श्री भीमाशंकर शिवाचार्य महाराज यांनी धर्म की जय हो सनातन धर्म की रक्षा हो, परंपरा की रक्षा हो असा संदेश या कार्यक्रमातून समाज बांधवांना देण्यासाठी व १००८ ही पदवी मिळून २५- वर्ष पूर्ण झाले असल्याने रजत महोत्सव
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही सांगितले.
यावेळी धर्माची महती महंतांची महती समाज बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी व जे गोरगरीब समाज बांधव केदारनाथ येथे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती बनवून त्यांचे दर्शन घडवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन दिनांक ५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी पर्यंत काहीच केलेले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण, ईश्वरराव भोसीकर, किशोर स्वामी, बालाजी पांडागळे, एकनाथ मामडे, गंगाप्रसाद काकडे, राजू काळे, विनोद कांचनगिरी त्यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.






















