दोन वेळा सत्ता मिळूनही देखील मंगळवेढाच्या विकासासाठी केलेल्या पाच गोष्टी सांगा. दोनदा संधी देऊन तालुक्यासाठी काहीच केलं नसेल त्यांना परत का संधी द्यायची? असा प्रश्न आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.येथील काँग्रेस कार्यालयात 24 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणीप्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, सुनजय पवार, अॅड. नंदकुमार पवार, दिलीप जाधव, मारूती वाकडे, फिरोज मुलाणी, दादा पवार, अर्जुनराव पाटील, अमर सुर्यवंशी, नाथा ऐवळे, मनोज माळी, रविकिरण कोळेकर, पांडुरंग माळी, पांडुरंग जावळे, विष्णुपंत शिंदे, बापू अवघडे, आयेशा शेख, जयश्री कवचाळे, सुनिता अवघडे, आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाल्या की, मी लहानपणापासून सत्ता उपभोगली आहे. सत्तेसाठी व टक्केवारीसाठी राजकारण मला करायचे नाही. सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि तेच मला आव्हान वाटतात शासनाने स्मार्ट सिटी करण्यापेक्षा स्मार्ट गावे करण्यासाठी पुढाकार घेतला असता तर अधिक चांगले वाटले असते.