कुर्डूवाडी – माढा पंचायत समितीचा कारभार हा सर्वसामान्य सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून येथून पुढे केला जाईल.विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विविध विकास कामे तालुक्यात केली जातील.याबरोबरच भ्रष्टाचार मुक्त पंचायत समिती करून विकासाचा मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नूतन सभापती पंडित देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
@ रोजगार हमी योजनेच्या विहीरींच्या भ्रष्ठाचाराबाबत आ.अभिजीत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थीत केला होता.यामुळे पंचायत समितीचा कामाचा दर्जा,अधिका-यांच्या कामात असलेला ढीसाळपणा,बिघडलेली परिस्थीती, गमावलेली प्रतीष्ठा यावर तालुक्यात मागील चार वर्षात अनेक प्रश्न उपस्थीत झाले होते. एकंदरीत चार वर्षात खुळ्यागत झालेल्या पंचायत समितीची गमावलेली प्रतीष्ठा व वैभव पुन्हा निर्माण करण्याचे आव्हाण नूतन सभापती यांच्यापुढे असल्याची जाणीव सभापतींना चागलीच असल्याचे त्यांच्या आजच्या कार्यभार स्विकारण्याच्या कामकाजावरून दीसुन आले.
माढा पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुखांची ओळख व बैठक सभापती देशमुख यांच्यावतीने कुर्डूवाडी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी सकाळी १२ ते ३ वाजण्याच्या सुमारास घेण्यात आली.यावेळी सरपंच हनुमंत गिड्डे,गटनेते(राष्ट्रवादी,अजित पवार गट)डॉ.आशिष रजपूत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी विभाग प्रमुखांना बैठकीत बोलताना सभापती देशमुख यांनी सांगितले की सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात इथून पुढे काम करावे.कोणाची अडवणूक करू नये.पंचायत समिती परिसरातील स्वच्छतेबरोबरच गावोगावच्या स्वच्छतेवर देखील भर द्यावा. याबरोबरच तालुक्यातील रोहयोतील विहिरी यासह इतर विकास कामे,घरकुल योजना,विविध पाणीपुरवठा योजना,शिक्षण विभागातील समस्या,महिला बालकल्याण व बांधकाम विभागातील विविध कामे,आरोग्य विभागातील विविध कामे,विविध विभागातील रिक्त जागा यासह सर्व विभागाच्या कामांचा थोडक्यात आढावा त्यासंबंधी विभागप्रमुखाकडून घेण्यात आला.तब्बल ३-४ वर्षानंतर प्रथमच विभाग प्रमुखांना पहिल्यांदाच सभापतींच्या बैठकीला हजर राहवे लागले असल्याने थोडे अवघडल्यासारखे झाल्याचे दिसून आले.
या बैठकीला बीडिओ महेश
सुळे,टीएमओ डॉ.सागर गायकवाड,उपअभियंता अजित पवार,गटशिक्षणाधिकारी विकास यादव,सीडीपीओ बालाजी अल्लडवाड, उपअभियंता कमलाकार साळुंखे, कृषी अधिकारी मिरगणे,पशुधन विकास अधिकारी डॉ.विवेक शिंदे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.




















