पंढरपूर – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढीपाडवा सणानिमित्त सर्व सभासदांना व सन २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या सर्व ऊस पुरवठादार व कामगारांना २५ किलो पॅकींगमध्ये रुपये ३०/- प्रती किलो या दराप्रमाणे २५ किलो साखर प्रति सभासद, ऊसपुरवठादार व कामगार यांना साखर वाटप करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन तथा माढ्याचे
आमदार अभिजित पाटील यांनी जाहीर केले.
दरम्यान पंढरपूर येथील साखर वाटपाच्या केंद्राचे उद्घाटन श्री विठ्ठल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर दाजी चव्हाण, संत मुक्ताबाई मठाचे व्यवस्थापक शशिकांत पाटील, वास्तुशिल्पचे मालक व निशीगंधा बँकेचे चेअरमन आर.बी. जाधव, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर काशिद, आनंदबापु पाटील, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व गजानन मेडिकलचे मालक गजाननबापू बागल यांचे हस्ते करण्यात आले.
या बरोबरच कारखाना साईटवरील साखर वाटप केंद्राचे उद्घाटन संचालक प्रविण कोळेकर व सिध्देश्वर बंडगर, वर्क्स मॅनेजर यु.के. तावरे, चिफ केमिस्ट बी. आर. माने, लिगल ऑफिसर ओ.जे.अवधुत, चिफ अकौंटंट ओ.एस. शिंदे, शुगर सेल अधिकारी महेश घाडगे, हेड टाईम किपर एस.एस. जगताप व इतर अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी कारखान्याचे, सर्व सभासद, ऊसपुरवठादार, ठेकेदार, अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते. तरी सर्व सभासद यांना विनंती की, कुपनाशिवाय साखर मिळणार नाही व कुपनावरती नमुद केलेल्या मुदतीमध्ये साखर घेऊन जावे असे देखील आवाहन यावेळी कारखान्याचे संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.
————————-
या ठिकाणच्या केंद्रावर मिळणार साखर
बुधवार दि.०४ मार्च २०२६ पासून ते ३१.०३.२०२६ पर्यंत कारखाना साईटवर विठ्ठल कॅन्टीन शेजारी व पंढरपूर शहरामध्ये समृध्दी ट्रॅक्टर शोरुम, कॉलेज रोड, पंढरपूर येथे वाटप चालू राहील. या बरोबरच मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस व सांगोला येथील ऊस पुरवठादार यांनी पंढरपूर येथील साखर वाटप केंद्रातून साखर कुपनवरती नमुद केलेल्या मुदतीमध्ये साखर घेवून जावी.
तसेच माढा, करमाळा, बार्शी व परांडा गेटकेन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसाठी माढा विभाग: शेटफळ रोड, माढा, करमाळा व टेंभुर्णी विभाग : शिवसंकल्प गौरी प्लाझा, हॉटेल सुमित समोर, टेंभुर्णी, लऊळ विभाग: मौजे लऊळ गट ऑफिस, पंढरपूर-कुडूवाडी रोडवर, लऊळ येथे साखर वाटप केंद्र चालु केलेले असून सदर केंद्रातील साखर वाटप दि.०५ मार्च २०२६ ते १८ मार्च २०२६ पर्यंत साखर चालु राहिल.
——————–
या वेळेत मिळणार साखर
दरम्यान साखर वाटप केंद्र हे सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० व दुपारी १.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये चालू राहतील. तसेच सध्या कारखान्याचा ऑफ सिझन चालू असल्यामुळे दर शनिवार, रविवार या दिवशी सुट्टी असल्याने व इतर जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या दिवशीही साखर दुकान बंद राहील.



























