पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे मकर संक्रांतीच्या व भोगीच्या सणानिमित्त पिलीव बाजारपेठेत महीलांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी दिसत आहे.यंदा मंगळवारी भोगी तर बुधवारी मकर संक्रांतीचा सण आहे.
मंगळवारी भोगीचा सण असल्यामुळे आज सोमवारी महीलांनी आवश्यक असणाऱ्या सर्व भाज्या यामध्ये पालक,मेथी,शेपु,चुका, हरभरा,गाजर,बोरे, तिळ, हरभरा डहाळा, ज्वारीचे कणीस, या आवश्यक सर्व भाज्या खरेदीसाठी महीलांनी मोठी गर्दी केली होती .दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला स्वस्त आहेत. तर बुधवारी असणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त महीला सुगड खरेदीसाठी तसेच बांगड्या भरणयासाठी तसेच चुडे _ पाटल्या व इतर साहीत्य खरेदी करण्यासाठी पिलीव बाजारपेठेत महीलांनी मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून येत आहे .
मकर संक्रांती बुधवारी आहे यानिमित्त पिलीव परिसरातील महीला पिलीव येथील महालक्ष्मी तसेच इतर सर्वच देव देवतांना ओळखता. तर अनेक महीला पंढरपूर, गोंदावले किंवा इतर देवांना वाण घेऊन ओवसणयासाठी जातात तसेच महीला घरोघरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात तसेच आपल्या ऐपतीनुसार वाण लुटतात. मकर संक्रांती व भोगीच्या सणानिमित्त पिलीव बाजारपेठेत सध्या महीलांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
पिलीव बाजारपेठेत भोगी व मकर संक्रांतीच्या सणानिमित्त महीलाची खरेदीसाठी गर्दी




















