सोलापूर – फडकुले सभागृह येथे समृद्धी कला मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मधे मुंबईच्या यश पाटील प्रथम क्रमांक तर महाड चा अमोल गोळे द्वितीय क्रमांक आला आहे. तसेच उद्योजक युवक सुहास आदमाने व वैदयकिय क्षेत्रातील युवती ऋचा गोडगे यांना समृद्धी युवा पुरस्काराने मानपत्र, फेटा, शाल व बुके दे ऊन सन्मानीत करण्यात आले असे समृद्धी सोशल फाऊडेशन चे अध्यक्ष संजय सावंत यांनी कळविले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 47 स्पर्धकांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वकौशल्याच्या जोरावर उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजन सावंत प्रमुख पाहूणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी शिंदे होते.
या प्रसंगी ॲड बसवराज सलगर, दीपक काळे, डॉ सुभाष कदम, कृष्णकांत चव्हाण, समचंद्र दत्तू , राजू प्याटी, सुमित फुलमामडी, चंद्रकांत होळकर , मल्हारी बनसोडे, किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. शिवाजी शिंदे सर (सहाय्यक कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर) यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत, “आजची मुले AI शी बोलतात, पण आईशी बोलत नाहीत,” हे वास्तव अधोरेखित केले.व त्यांच्या भाषणाने जीवन कसे जगावे हे त्यांनी काव्यातून सांगितले.
स्पर्धेचे परीक्षक प्रा. रोहित देशमुख यांनी उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम वाचनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले, तर प्रा. पंकज पवार सर यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करत अधिक प्रगल्भ होण्याचा संदेश दिला.
हे आहेत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक – यश पाटील (मुंबई)
द्वितीय क्रमांक – अमोल गोळे (महाड)
तृतीय क्रमांक – कार्तिक दराडे (उदगीर)
चतुर्थ क्रमांक – अभय अळशी (मुंबई)
उत्तेजनार्थ – संकेत पाटील (कोल्हापूर)
यांनी पटकावले.

















