येरगी बालिका पंचायत भारतीय जवानांना राख्या पाठवणार
देगलूर: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येथील बालिका पंचायत राज समितीच्या वतीने गावातून भारतीय जवानांना राख्या पाठवणार आहेत. जिल्ह्यातील कंधार येथील सुंदर अक्षर कार्यशाळेचा दरवर्षी भारतीय सीमेवरील जवानांना ३३३३ राख्या पाठवण्यात येतात. त्यांचा या उपक्रमाचा हा ११ वा वर्ष असून त्यात येरगी बालिका पंचायत सहभागी होणार आहे.
काल येरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन या उपक्रमाची माहिती सुंदर अक्षर कार्यशाळेचे दत्तात्रय येमेकर यांनी दिली.यावेळी गावचे सरपंच संतोष पाटील,बालिका पंचायत चे पदाधिकारी ,उपक्रमाचे
प्रा. गंगाधर तोगरे, राजेश्वर कांबळे ,शाळेचे मुख्याध्यापक अशोक देवकत्ते व सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.
भारतीय जवानांना राख्या पाठवण्या मागचा उद्देश प्रा.गंगाधर तोगरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितला.
यानंतर संतोष पाटील यांनी या उपक्रमासाठी बालिका पंचायत,शाळेतील मुली आणि गावातील महिला या उपक्रमाअंतर्गत सामील होऊन देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना राख्या पाठवतील असे सांगितले.यासोबत गावातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी दत्तात्रय एमेकर यांच्या आईच्या नावाने एक वृक्ष लावण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे स्वागत चालुक्य कालीन नगरी येरगी कॉफी टेबल बुक देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर वाडीकर यांनी केले.कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी,गावातील बचत गटातील महिला,बालिका पंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते.