सकल ब्राह्मण समाजातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार.
परतूर प्रतिनिधी :-
येथील, “परतूर सकल ब्राह्मण समाजातर्फे” इंदिरा मंगल कार्यालय येथे दि. २३ रोजी परतूर येथील ब्राह्मण समाजातील दहावी, बारावी व इतर क्षेत्रातील परिक्षा विशेष प्राविण्यसह गुण प्राप्त करून पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयनाना राखे हे होते तर प्रमुख पाहुणे तसेच प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथे नामांकित कंपनीत कार्यरत असलेले केदार दिक्षित हे होते.
मुलांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते केदार दिक्षित म्हणाले की, केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर एवढच तुमचं ध्येय न ठेवता इतरही असे बरेच क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कर्तव्याचा ठसा उमटवू शकता, प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थी दशेत असताना तंत्रज्ञानातला बदल अंगिकारला पाहिजे व त्यासोबत पुढे गेलं पाहिजे.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना विजयनाना राखे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे त्याच्या पालकांचा सिंहाचा वाटा असतो कितीही मोठे व्हा पण आपल्या जन्मदात्यांसमोर लहानच रहा त्यांच्या उपकारांची जाण ठेवा गुरुजन आणि वडीलधारे यांचा नेहमी आदर करा तरच तुमच्या मोठेपणाला मोठेपण येईल.
यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते खालिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शांभवी देशपांडे, समृद्धी चामणीकर, वेदिका जोशी, वैभवी जोशी, दिपाली कुलकर्णी, ऋतुजा आठवे, उमा देशपांडे, तन्मई बोर्डे, अर्णव पाठक, वैभव देशपांडे, हर्षिद देशपांडे, विराज महाजन, आदित्य देशपांडे, पार्थ मेहता, साईराज शर्मा, सोहम जोशी, भावेश कुलकर्णी, आर्यन मेहता, पुजा मेहता, श्रध्दा शर्मा, शुभंकर जोशी, उत्कर्ष कुलकर्णी तसेच परतुर येथील समाजाचे नाव मराठी चित्रपट सृष्टीत उज्वल करणाऱ्या योगेश कुलकर्णी याचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांची ओळख पंकज पांडे यांनी करुन दिली, या कार्यक्रमाचे स्वागत गीत सौ सुचिता जोशी यांनी गायले तर प्रास्ताविक मा प्रा श्री प्रमोद टेकाळे यांनी केले सूत्रसंचालन गोविंद पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन भालचंद्र महाजन यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र जोशी, धनंजय जोशी, सिद्धार्थ कुलकर्णी, शशांक पाठक, शंतनु कुलकर्णी, विठ्ठल कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, दुर्गेश पोतदार इत्यादी समाज बांधवांनी विशेष सहकार्य केले.