श्रावण विशेष : श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, व्रत, उपवास आणि महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा काळ. शिवमहापुराणात वर्णन केलेले १२ ज्योतिर्लिंग केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. १२ राशी आणि १२ ज्योतिर्लिंग यांच्यातील नाते हे भक्तांसाठी विशेष मार्गदर्शक ठरू शकते.
या श्रावणात, राशीनुसार संबंधित ज्योतिर्लिंगाचे स्मरण, पूजा किंवा तिथे प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेतल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. भोलेनाथ आपल्या भक्तांचे दुःख हरतात, आणि या पवित्र मासात त्या कृपेचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा!
आपण आपल्या राशीप्रमाणे कोणत्या ज्योतिर्लिंगाला वंदन करायचे हे ठरवून श्रद्धेने पूजा केली, तर जीवनात सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहणार नाही.
कसे कराल पूजाः
- आपल्या राशीचे ज्योतिर्लिंग जाणून त्याचे नामस्मरण करा
- शक्य असल्यास त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दर्शन घ्या
- “ॐ नमः शिवाय” चा जप आणि बेलपत्र अर्पण करा
- शिवपुराण किंवा रुद्राष्टकाचे पठण करा
श्रावणात राशीनुसार शिवपूजा केल्याने मन, धन आणि जीवनात यश निश्चित मिळते.
हर हर महादेव!