माढा : तालुक्यातील होत असलेल्या ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना आज पहिले प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी दिली.
येत्या पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे त्या अनुषंगाने आज प्रशिक्षणासाठी १७३४ कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले होते आज या कर्मचाऱ्यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष सहायक मतदान अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते
या प्रशिक्षणास जवळपास २२९ कर्मचारी गैरहजर होते त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया कशी पार पाडावयाची याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री आव्हाड आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी दिली.


























