Tuesday, March 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – चंद्रकांत पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 17, 2023
in solapur
0
उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – चंद्रकांत पाटील
0
SHARES
112
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्याअनुषंगाने नागरिक व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजना बाबत चर्चा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, उजनी धरण जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. उजनी धरणातून जिल्ह्यात सिंचनासाठी तसेच सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडले जाते. यावर्षी उजनी धरणातील पाणी पातळी ६०.६६ टक्के असल्याने उपलब्ध पाण्याबाबत सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे. धरण परिसरातील अनधिकृत पाण्याचा उपसा होणार नाही याबाबत जलसंपदा विभागाने दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कालवा सल्लागार समितीची बैठक २५ किंवा २६ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. उजनी धरणात आज रोजी उपयुक्त पाणीसाठा ६०.६६ टक्के(३२.५० टीएमसी) इतका असून या प्रकल्पावर सीना माढा उपसा सिंचन योजना, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव सिंचन योजना तसेच चार मोठे प्रकल्प, सात मध्यम प्रकल्प, ५६ लघु प्रकल्प व 90 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या प्रकल्पातून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी यांनी यावेळी सांगितले.

Post Views: 189
Previous Post

सोलापुरात अद्यापही चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा

Next Post

सोलापुरात सुगंधी पान मसाला तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापुरात सुगंधी पान मसाला तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक गुन्हा दाखल

सोलापुरात सुगंधी पान मसाला तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान #public #marathinews #viral

March 10, 2026

धुळे सोलापूर महामार्गावर मोठा अनर्थ टळला. #public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews

March 10, 2026

रेणापूर तालुक्याचे सर्वांगीण हित लक्षात घेऊन भाजपा – मनसेची युती#mns #bjp #marathinews #solapurnews

March 10, 2026

पंचायत समिती चाकूरच्या सभापतीपदी जयश्री नागरगोजे तर उपसभापतीपदी भुजंग शिंदे यांची बिनविरोध निवड.

March 10, 2026

मंठा शहरात महिला दिन उत्साहात साजरा. #public #marathinews #solapurnews #maharashtranews #aajsolapur

March 10, 2026

अखेर ” मिस इंडिया अर्थ ” सायली सुर्वेची घरवापसी..#मराठी #viral #public #solapurnews #viral

March 10, 2026

राज मेमोरियल मध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र आल्या विविध क्षेत्रातील महिला.#women_respect_video #viral

March 10, 2026

डॉ. वळसंगकर खटल्यात आमच्याकडे भक्कम पुरावे – ॲड. प्रदीपसिंग राजपूत #public #marathinews #viral

March 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0723232

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697