जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आरोग्य मंत्री यांचे नातू आणि माजी परीवहन मंत्री यांचे चिरंजीव असलेले अद्वय हिरे यांना पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. यामुळे नाशिकच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून काम केलेले आणि बरखास्त झालेल्या संचालक मंडळातील सदस्य असलेले तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मालेगाव मधील महत्त्वपूर्ण शिलेदार म्हणून ओळख असलेल्या आणि नाशिकचे पालकमंत्री शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून पुढे येत असलेले माजी आरोग्य राज्यमंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू आणि माजी परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे यांचे द्वितीय चिरंजीव अव्दय हिरे यांनी त्यांच्याच परिवाराची असलेल्या रेणुका सुत गिरणी या संस्थेला साडेसात कर्ज मंजूर केले होते. या कर्जाची रक्कम आता व्याजासह तीस कोटी रुपयांच्या घरात गेलेली आहे परंतु ही रक्कम भरली गेली नाही त्यामुळे जिल्हा बँकेने कारवाई सुरू केली होती या कारवाईच्या विरोधात हिरे हे मुंबई हायकोर्टात गेले होते परंतु त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळाला नाही त्यांचा अटकपूर्व जामीन हा फेटाळण्यात आला त्यानंतर तातडीने पोलिसांनी हिरे यांना अटक केली आहे. जिल्हा बँकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे आठ महिन्यापूर्वी जिल्हा बँकेकडून मालेगाव येथील रहमान पोलीस ठाण्यामध्ये रेणुका सूतगिरणीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये अद्वय हिरे हे प्रमुख होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...