सिटीलिंक बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने दोन महिलांकडील पावणेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पोती चोरून नेल्याची घटना भरदुपारी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी लताबाई चिंतामण मोरे (वय ५८, रा. जालखेड, ता. दिंडोरी) या काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निमाणी बस स्टॅण्ड येथे आल्या होत्या.
त्यावेळी त्या सिटीलिंक बसने प्रवास करण्यासाठी जात असताना बसमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने मोरे यांच्यासह साक्षीदार महिलेच्या जवळ असलेल्या २ लाख ७० हजार ये रुपये किमतीच्या सोन्याच्या पोती नजर चुकवून चोरून नेल्या. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वनवे करीत आहेत.