उत्तरप्रदेशातील नोएडामध्ये 2006 साली घडलेल्या निठारी हत्याकांडातील दोषी मोनिंदर सिंग पंढेर आणि सुरेंद्र कोहली यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाने या दोघांची फाशीची शिक्षा रद्द केलीय.
मोनिंदर सिंग आणि सुरेंद्र कोहली मॉरल ट्रॅफिकिंग कायद्यान्वये दोषी आढळले होते. याप्रकरणी सिमरनजीत कौरची भ्रष्टाचार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सीबीआय कोर्टाने 19 मे 2022 रोजी दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी सुरेंद्र कोहली आणि मोनिंदर सिंग पंढेर यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे. अलाहबाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सुरेंद्र कोहली यास 12 आणि मोनिंदर सिंग पंढेर याला दोन प्रकरणात दिलेली फाशीची शिक्षा रद्द केलीय. या दोन्ही आरोपींच्या 14 अर्जावर हायकोर्टात सुनावणी करण्यात आली. सबळ पुरावा आणि साक्षीदार नसल्याने न्यायालयाने दोन्ही दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द केली आहे.
गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 2017 मध्ये पिंकी सरकार हत्या प्रकरणात सुरेंद्र कोहली आणि पंढेर यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी गाझियाबाद येथील विशेष न्यायालयाने व्यापारी मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोहली यांना निठारी हत्याकांडात दोषी ठरवले होते. सुरेंद्र कोहली आणि मोनिंदर पंढेर यांना न्यायाधीश पवन कुमार तिवारी यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण पिंकी सरकारच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात पंढेर आणि कोहली हे अपहरण, बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात दोषी आढळले होते.
नोएडाच्या निठारी येथे 2006 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा देशभरात या भयानक प्रकरणाची चर्चा जोरदार रंगली होती. नोएडातील निठारी गावातील कोठी क्रमांक डी-5 मधून सांगाडे मिळू लागल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान मानवी हाडांचे काही भाग आणि अशी 40 पाकिटे सापडली, ज्यामध्ये मानवी अवयव भरून नाल्यात फेकण्यात आले होते. याप्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोहली हा उत्तराखंडचा रहिवासी असून तो मोनिंदर सिंग पंढेरच्या घरी कामाला होता. निठारीतील बंगल्यात 2004 पासून पंढेर आणि कोहली दोघेच होते. मग याच बंगल्यात दोघांनी केलेल्या खून आणि बलात्कारासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.