Sunday, June 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दयानंद महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
March 19, 2026
in editor
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पी. एम. उषा योजनेअंतर्गत रसायनशास्त्र विभाग दयानंद महाविद्यालय सोलापूर तसेच रसायनशास्त्र संकुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 व 10 मार्च 2026 रोजी करण्यात आली. ही परिषद मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन केमिस्ट्री 2026 या विषयावर आयोजित करण्यात आली.


सदर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी परिषदेचे संयोजक डॉ एस वाय जाधव आणि डॉ ए घनवट यांनी परिषद आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.
परिषदेचे उद्घाटन प्राध्यापक एल बी दामा, प्रकुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी रसायनशास्त्राचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद केले आणि रसायनशास्त्राची दुसऱ्या विषयांबरोबर सांगड घातल्यास जीवन समृद्ध होईल असे मत मांडले.


प्राचार्य बी एच दामजी, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांनी अशी परिषद ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. तसेच, प्राध्यापक व्ही. पी. उबाळे प्रशासक, दयानंद संस्था, सोलापूर यांनी परिषदेचे महत्त्व विशद केले.
राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी डॉ सिद्धनाथ भोसले, शास्त्रज्ञ, आयआयसीटी, हैदराबाद; डॉ. नंदकुमार पाटील, आर के फार्मा, वडोदरा; प्राध्यापक बापूराव शिंगटे, छत्रपती संभाजी नगर डॉ.एम के पाटील, धाराशिव; तसेच दुसऱ्या दिवशी प्रा. जे मंजन्ना, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावी, प्रा. व्यंकट रमण दोडी , केंद्रीय विद्यापीठ, कलबुर्गी, प्रा. देऊ भांगे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. प्रकाश वडगावकर, शास्त्रज्ञ, एनसीएल पुणे यांनी अद्यावत संशोधनाचा आढावा घेऊन त्याचे भविष्यातील समस्या सोडवण्यासाठी होणारा उपयोग याबद्दल माहिती दिली. त्यामुळे ही परिषद रसायनशास्त्रातील आधुनिक संशोधन, शाश्वत तंत्रज्ञान, हरित रसायनशास्त्र, औषधी रसायनशास्त्र आणि रसायनशास्त्राचा इतर विषयाशी संगम ह्या विषयावर विचार मंथन करणारी ठरली.
सदर परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील 280 पेक्षा अधिक संशोधकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.


दोन दिवस चालत असलेल्या या परिषदेमध्ये विविध तांत्रिक सत्रे , व्याख्याने आणि संशोधकांचे सादरीकरण यामुळे वातावरण उत्साह पूर्ण होते. सदर सहभागी विद्यार्थ्यांमधून 25 विद्यार्थ्यांनी मौखिक सादरीकरणांमध्ये सहभाग नोंदवला तसेच 33 विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरणांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांमधून दहा विद्यार्थ्यांना मौखिक सादरीकरणासाठी पारितोषिके वितरित करण्यात आली, तसेच 13 विद्यार्थ्यांना पोस्टर सादरीकरणासाठी पारितोषिके वितरीत करण्यात आली.


परिषदेच्या समारोपा प्रसंगी प्रा. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. एस आर पुजारी यांनी करून दिली.
आपल्या मार्गदर्शनामध्ये , आदरणीय कुलगुरूंनी रसायनशास्त्राच्या संशोधनाचे विविध किस्से, नवीन कल्पना व त्याचे समाज उपयोगी रूपांतरण कसे करता येईल याच्याबद्दल माहिती दिली आणि यामुळे समाजाचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल असा विश्वास व्यक्त केला.


राष्ट्रीय परिषदेचे संयोजक प्रा. एस वाय जाधव तसेच डॉ. ए ए घनवट यांनी दोन दिवसीय परिषदेचे सविस्तर विवेचन केले. समारोपाप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. पी. उबाळे प्रशासक दयानंद संस्था, सोलापूर यांनी विद्यापीठाविषयी कृतज्ञता व्यक्त करून विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. तसेच, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बी एच दामजी यांनी अशा अशा परिषदांचे आयोजन वारंवार झाल्यास संशोधन वृत्तीला चालना मिळेल असे मत व्यक्त केले.


सदर परिषदेमध्ये सहभागी संशोधकांनी परिषदेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या.
सदर परिषदेअंतर्गत सूत्रसंचालन डॉ. आर जी गवळी यांनी केले असून डॉ. एस पी देशमुख यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
राष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी, श्री महाजन के जे, श्री ए एस बिराजदार, श्री वी आर शेकदार, ऋतुजा मोठे, सायली तूपसाखरे, वैष्णवी वनमाने, सीमा बीळूरे, अमर मैनाक, सुजय घोरपडे, रवींद्र पाटील इत्यादी शिक्षक; तसेच श्री आडकी श्री कविटकर श्री आळंदी श्री देगावकर श्री सरसंबे श्री डोंगरे, श्रीमती हिरेमठ आणि श्रीमती पाटील इत्यादी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे राष्ट्रीय परिषद यशस्वी झाली

Post Views: 122
Previous Post

भारतीय योग संस्थानच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा

Next Post

संगीत आणि नाटक या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संगीत आणि नाटक या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता

ताज्या बातम्या

ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी

ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मुर्तीवरील दागिन्यांची चोरी

June 20, 2026

शहरातील ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या – चंदनशिवे, सावंत, मोरे गुन्हे शाखेत

June 20, 2026
श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 20, 2026

शाळांवर अचानक तपासणी; गैरहजर शिक्षकांवर थेट कारवाई

June 20, 2026
मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

June 20, 2026

“विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 20, 2026
प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सिंहगडचे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सेवेत

June 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0925739

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697