दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ३ ऑक्टोबरला काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.या ब्लॉकमुळे पुणे -सोलापूर -पुणे एक्स्प्रेस, पुणे- बारामती पैसेंजर, पुणे – दौंड पैसेंजर, बारामती – दौंड पैसेंजर, दौंड -पुणे पैसेंजर आणि दौंड- हडपसर पैसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचवेळी काही गाड्या सुटण्याची आणि पोहोचण्याची ठिकाणे बदलण्यात आली आहेत. त्यात २ ऑक्टोबरला इंदूरहून सुटणारी इंदूर – दौंड एक्स्प्रेस ही गाडी पुण्यापर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला दौंडवरून सुटणारी दौंड – इंदूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्यातून सुटेल. हैदराबादहून सुटणारी हैदराबाद – हडपसर एक्स्प्रेस ही गाडी २ ऑक्टोबरला दौंडपर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला हडपसरवरून सुटणारी हडपसर – हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी दौंडमधून सुटेल.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...