दिवाळी/पूजा/छठ सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने बिकानेर ते साईनगर शिर्डी दरम्यान १४ साप्ताहिक उत्सव विशेष ट्रेन चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे –
04715 साप्ताहिक उत्सव विशेष दि. १८.११.२०२३ ते ३०.१२.२०२३ (७ फेऱ्या) पर्यंत दर शनिवारी १२.१० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता पोहोचेल.
04716 साप्ताहिक उत्सव विशेष १९.११.२०२३ ते ३१.१२.२०२३ (७ फेऱ्या) दर रविवारी साईनगर शिर्डी येथून १९.३५ वाजता सुटेल आणि बिकानेर येथे तिसऱ्या दिवशी ५.०० वाजता पोहोचेल.
थांबे: श्री डुंगेरगढ, राजलदेसर, रतनगड, चुरू, फतेहपूर शेखावती, लक्ष्मणगढ सीकर, सीकर, रिंगास, ढेहर का बालाजी, जयपूर, दुर्गापुरा, सवाई माधोपूर, कोटा, रामगंज मंडी, शामगढ, नागदा, उज्जैन, संत हिरदाराम नगर, भोपाळ , इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ आणि मनमाड.
संरचना: २० डब्बे खालीलप्रमाणे- १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण: ट्रेन क्रमांक 04716 च्या फेऱ्यांसाठी बुकिंग दि. १०.११.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.