रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आला आहे. यापूर्वी अंबानी यांना धमकीचे 2 ईमेल आले होते. त्यात 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु, अंबानी यांनी त्याच्या ईमेलला उत्तर न दिल्यामुळे आरोपीने आता तिसरा मेल पाठवत 400 रुपयांच्या खंडणीची मागणी केलीय.
या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सोमवारी अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलियाची) सुरक्षा वाढवली आहे.अंबानी यांना धमकीचा पहिला ईमेल 26 ऑक्टोबरला आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर त्याची किंमत 200 कोटी रुपये करण्यात आली. पैसे न दिल्यास मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असेही धमकीच्या मेलमध्ये म्हणले आहे.अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवलेल्या तिसऱ्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, ”तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत 400 कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत.” असेही या धमकीच्या ई-मेलमध्ये नमूद आहे.