मंगळवेढा शहरात येणा-या अवजड वाहतुकीवर बंदी न घातल्याने सद्गुरु बैठकीसाठी जाणाऱ्या दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला. दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी पंढरपूर रोडवर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रास्ता रोको आंदोलन करत ठिय्या मांडला आहे.
शहरात येणारी अवजड वाहतूकीने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. ती वाहतूक बंद करावी व ती वाहतूक पंढरपूर बायपास मार्गे वळवण्यात द्यावी या मागणीसाठी नारायण गोवे व वारी परिवार हे सातत्याने प्रयत्न करीत होते. शांतता कमिटीच्या बैठकीत देखील या प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. नगरपालिकेच्या दालनात 21 सप्टेंबरच्या बैठकीत बाह्यवळण मार्गावर पंढरपूर रोड घाडगे कनेक्शन येथे व विजापूर रोड पुलाजवळ मंगळवेढा पोलीस स्टेशनकडून होमगार्डची नेमणूक तातडीने करणे, सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत शहरातून जड वाहतुकीस मनाई असले बाबतचे मराठी,हिंदी,इंग्रजी अक्षरातील बोर्ड तयार करून शहरात प्रवेश होणारे पंढरपूर रोड घाडगे कलेक्शन येथे व विजापूर रोड पुलाजवळील बाह्यवळण मार्गावर मंगळवेढा नगरपरिषदेकडून बोर्ड लावणे तसेच राष्ट्रीय महामार्गावरील नियमांचे पालन करून मंगळवेढा नगरपरिषदेकडून प्रकाश परावर्तित होणारे रबरी गतिरोधक बसविण्याचे ठरले बंद करणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले होते. मात्र त्यामध्ये कोणतेही प्रकारचे अंमलबजावणी केली नाही.