टाकळी सिकंदर, ता. मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कै. पैलवान भीमराव (दादा) महाडिक सहकारी साखर कारखाना असे नामकरण करण्याचा ठराव आवाज मतदानाने मंजूर झाला असून, कारखान्याच्या सभेत काय ठराव झालेत याची प्रत दिवंगत सभासद व कर्मचारी यांच्या घरी पोहोचविली पाहिजे ही प्रथा सुरू करावी, अशी सूचना कारखान्याला दिली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खा. धनंजय महाडिक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
खा. महाडिक म्हणाले, सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. वरचे वर निसर्गाची अवकृपा हे ही त्याला महत्त्वाचे कारण आहे. साखर कारखान्यांना पूर्वीप्रमाणे आता उसा पासून फक्त साखर उत्पादित करून चालणार नाही तर, विविध उपपदार्थ निर्मितीवर भर दिला तरच भविष्यात साखर कारखानदारी टिकणार आहे.