दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ झाला आहे. जास्त उंचीच्या मुलींना बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या मुलींनी दहिसरमध्ये आंदोलन सुरू केले आहे. गोंधळ झाल्यामुळं दहिसरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
162 सेमी पेक्षा जास्त उंची असलेल्या मुलींनाही बाहेर काढल्याचा आरोप
जास्त उंचीच्या मुलींना देखील बाहेर काढल्याचा आरोपांवरुन दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ झाला आहे. 162 सेमी पेक्षा जास्त उंची असलेल्या मुलींनाही बाहेर काढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या महिलांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या महिला उमेदवारांना अडवण्याच्या प्रयत्न सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या भरतीसाठी आलेल्या मुलींवर एम. एच. बी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही मुली जखमी झाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.