कळंब तालुक्यातील देवळाली येथील मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या शेतमजुराचा अचानक लागलेल्या आगीत गोठा जळून अक्षरशः राख झाली,तर सहा शेळ्या गंभीर भाजल्या आहेत त्यात दोन शेळ्या पूर्ण भाजपचे कळते.देवळाली येथील सुंदर रामा एडके यांचे गावातच कडेला घर आहे.जवळच शेळ्यांसाठी गोठा आहे.घरची परिस्थिती बेताची राहायला निट घर नाही म्हणून मुलगा नागनाथ हा गोठयातच अभ्यास करत असे राहतही असे.मात्र अचानक लागलेल्या या आगीत त्याचे सहा हजार रुपये रोख,शालेय पुस्तकं, वह्या असे साहित्य आगीच्या भस्मस्थानी जळाले.सदरील घटना संध्याकाळच्या वेळेत झाल्याने आगीचे स्पष्ट कारण समजू शकले नाही.मात्र जीवित हानी झाली नसली तरी त्यांचे उदरनिर्वाह असलेल्या शेळ्या गंभीरपणे भाजल्या आहेत त्यापन जिवंत राहतात की नाही असे प्रत्यकदर्शीने सांगितले.सदरील कुटुंब हे अत्यंत गरीब असून शासकीय मदत मिळावी अशी त्यांनी तरुण भारत वृत्तवेध प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.या आगीचे वृत्त मिळाल्यावर विजवितरणचे कर्मचारी यांनी भेट दिली आहे.तर गावचे तलाठी एस जे तोगरे यांनी पंचनामा करून कळंब तहसीलदार यांना कळविले आहे.सदरील ठिकाणी पशुवैद्यकीय कर्मचारी यांनी शेळ्यांसाठी औषध उपचार केले आहेत.सदरील घटनेबद्दल देवळाली गावत हळहळ व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...