Strange but true…
A huge crocodile appears with the body of a drowned child on its back & hands it over. The family had failed to find it from a the crocodile infested river in Indonesia.
VC:Gulf Today pic.twitter.com/HDSuKezRSh— Susanta Nanda (@susantananda3) January 24, 2023
इंडोनेशियामध्ये चार वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला. दोन दिवसांपासून त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता. कुटुंबीय, पोलीस प्रशासन, कोस्टगार्डकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र तरीही तो सापडला नाही. तितक्यात मच्छिमारांना नदीत एक मगर दिसली. तिला पाहून मच्छिमारांना धक्काच बसला. बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेह पाठीवर घेऊन मगर बोटीच्या दिशेनं गेली. तिनं पाठीवरील मुलाला बोटीपर्यंत नेलं. हा प्रकार पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला.
दहा फूट लांबीची मगर मुलाला पाठीवर घेऊन पोहत पोहत बोटीच्या दिशेनं आली. मगरीनं मुलाचा मृतदेह पाण्यात पडू दिला नाही. विशेष म्हणजे मगरीनं मृत मुलाला जमिनीवर नव्हे, तर एका बोटीपर्यंत सुरक्षित आणलं. बोटीत असलेल्या दोन मच्छिमारांनी मुलाचा मृतदेह मगरीच्या पाठीवरून बोटीत घेतला. डेली मेलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
मगरीनं मुलाला कोणताही धोका पोहोचवला नाही. मुलाच्या शरीरावर एकही जखम नव्हती. बेपत्ता मुलाचा मृतदेह एक मगर तिच्या पाठीवरून घेऊन येत असल्याची माहिती ईस्ट कालीमंतन सर्च अँड रेस्क्यू एजन्सीच्या सदस्यांना देण्यात आली. ही माहिती ऐकून सदस्यांना धक्काच बसला. ‘बुडालेल्या मुलाचा मृतदेह मगरीनं इतक्या दूरवरून अतिशय सुरक्षितपणे आणला. त्याला जराशीही इजा होऊ दिली नाही, हा प्रकार अविश्वसनीय आहे,’ असं सर्च अँड रेस्क्यू एजन्सीच्या प्रमुखांनी सांगितलं. ही घटना अतिशय आश्चर्यकारक असल्याचं ते म्हणाले.