सारंगखेडा घोडेबाजारात दाखल झालेल्या महागड्या घोड्यांची विक्री हे मालक करत नसतात. अश्वप्रदर्शनासाठी हे घोडे सारंगखेडा येथे दाखल होतात.अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा घोडे बाजारात दोन हजार घोडे दाखल झाले असले तरी बाजारात चर्चा आहे ती शनाया आणि शेराची. त्यांचा रुबाब आणि चाल पाहण्यासाठी अश्व प्रेमींनी सारंगखेड्याच्या बाजारात गर्दी केली आहे. एखाद्या राजासारखा शेराचा रुबाब आहे. तर शनायाचा तोरा एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. शनायाचा डाएट खुराक एखाद्या अभिनेत्रीसारखाच आहे. शिवाय या दोन्ही घोड्यांची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शेरा आणि शनायावर एक दोन लाख नव्हे तर तब्बल 70 लाखाची बोली लावली गेली आहे, मात्र मालकांनी या घोड्यांना विकलेलं नाही.