भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे नवे सीईओ होणार आहेत. सुसान वोजिकी यांच्या जागी मोहन विराजमान होतील. गेल्या नऊ वर्षांपासून जागतिक ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान डियान वोजिकी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी, 16 फेब्रुवारी रोजी याबाबत माहिती दिली आहे. “माझे कुटुंब, आरोग्य आणि वैयक्तिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आता माझ्यासाठी महत्वाचे आहे. मी YouTube सोडत आहे.” असे YouTube कर्मचार्यांना पाठवलेल्या पत्रात, सुसान वोजिकी म्हणाल्या आहेत.
सुंदर पिचाई हे Google आणि YouTube च्या मूळ कंपनी अल्फाबेटचे CEO देखील आहेत. YouTube हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. नील मोहन युट्युबच्या वरिष्ठ उपाध्यक्षाची भूमिकाही पार पाडणार आहेत.
नील मोहन सध्या YouTube चे मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांनी यूट्यूबमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, नील मोहनने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आहे आणि त्यांनी एक्स्चेंज कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.
अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “सुसानने एक विलक्षण टी तयार केली आहे आणि नीलमध्ये नवा उत्तराधिकारी सापडला आहे. नील YouTube च्या यशाच्या पुढील दशकात नेतृत्व करण्यास सक्षम आहे.”