गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने एका खटल्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावली होती, अश्या वेळी कायद्यानुसार त्यांची संसदेची सदस्यता रद्द करण्यात आलेली होती, मात्र याच निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने बदलून राहुल गांधी यांना दिलासा दिला होता, मात्र हे सर्व प्रकरण न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने घडले होते, तरीसुद्धा या प्रकरणात केंद्र सरकार हुकूमशहा आहेत असे बॅनर अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी लावले होते ते बॅनर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकत काँग्रेसचा जाहीर निषेध केला होता.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे व काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे बॅनर फाडल्याने युवक काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेत आज पुन्हा त्याच विद्यापीठ चौकात बॅनर लावत केंद्र सरकार व भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व भाजप युवा कार्यकर्त्यांना तुमच्यात हिंमत असेल तर चौकात येऊन दाखवा असे आवाहन केले. मात्र काही वेळातच या ठिकाणी पोलीस पोहचले व त्यांनी ते बॅनर काढीत कार्यकर्त्याना अटक करण्यास सुरुवात केली त्यामुळे काही वेळ याठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला होता.मात्र या पोस्टर वाॅरवरून भाजप युवा मोर्चा व युवक काँग्रेस वाद नक्कीच चिघळणार यात शंका नाही.